दैवताचा अपमान होऊनही शिवसेना गप्पच : राज ठाकरे

Foto
औरंगाबाद : महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला तरी शिवसेना गप्पच आहे. केवळ राजकारणासाठी महाराजांचा वापर केला जातो अशी टीका मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी केली. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारतांना ते बोलत होते.
मी भूमिका कधीच बदलत नसतो. मशिदीवरील भोंगे यांचा आवाज हा मुद्दा मी पहिल्यांदा मांडला होता. त्यामुळे आत्ताच मी हिंदुत्ववादी विचारांवर आलो असे म्हणणे चुकीचे आहे. ज्यांनी हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भूमिका घेतली त्यांनी पाकिस्तानी कलावंतांना विरोध केला, मात्र हाकलले का ? असा सवाल ठाकरे यांनी केला. रजा अकादमीच्या विरोधात माझ्या पक्षाने मोर्चा काढला होता. इतर पक्षांनी काढला का ? खरेतर आम्ही केलेल्या आंदोलनानंतर बांगलादेशींच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या. कृती माझा पक्ष करतो आणि हेच  सो कोल्ड हिंदुत्ववादी पक्ष नामानिराळे राहतात. मनसेच्या स्थापनेपासूनच मी मराठीचा मुद्दा हाती घेतला. मात्र मराठी म्हणून अंगावर आला तर मराठी म्हणूनच उत्तर देईल आणि हिंदू धर्माला कोणी न लावेल तर हिंदू म्हणून अंगावर जाईल, ही माझी पहिल्यापासून ची भूमिका राहिली आहे. मी सोयीनुसार भूमिका बदलतो असा आरोप चुकीचा आहे.
खरेतर हिंदुत्वाचा मुद्दा जनसंघाचा होता. आता इतर पक्षांनीही मुद्दे पळवले. मात्र मी पक्ष स्थापनेपासून माझी भूमिका बदलली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. संभाजीनगर का निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्व संभाजीनगर
... हा मुद्दा उचलला का असे विचारले असता त्यांनी हिंदुत्व आणि विकास याची गल्लत करू नका. हिंदुत्व स्वीकारले म्हणून विकास रखडतो असे होत नाही. 

पाच वर्षांपूर्वीच चा झेंडा !
मनसेने झेंडा बद्दल का बदला याबाबत स्पष्टीकरण देताना ठाकरे म्हणाले की, पाच-सहा वर्षापूर्वीच पक्षाने निवडणूक आयोगाला राजमुद्रेचा झेंडा सोपवला होता. फक्त दोन महिन्यापूर्वी अधिकृतपणे या झेंड्याचे अनावरण करण्यात आले.

  राजकीय पोकळी 
 शिवसेना काँग्रेस सोबत गेल्याने हिंदुत्ववादी पक्षाची राजकीय पोकळी निर्माण झाली त्याचा फायदा मनसे उचलत असल्याचा आहे का ? असे विचारले असता त्यांनी राजकीय पोकळी चा विषय नाही. गेल्या १४ वर्षात मनसेने थेट भूमिका मांडली आहे. 

 शहरे बदलणे माझी पॅशन 
प्रत्येक शहराचा अभ्यास करून नियोजनबद्ध विकास करणे आणि त्या शहरात आमुलाग्र बदल घडवणे ही माझी पॅशन आहे. मी देश-विदेशातील विकसित शहरांचा अभ्यास करून कशा पद्धतीने शहरात बदल घडवतो. नाशिकची उदाहरण डोळ्यासमोर आहेत तसा बदल औरंगाबादेतही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker